साई समर्थ सामाजिक संस्था मुंबई कडून चिखलगाव ग्राम पंचायतीला ऑक्सीजन कॉन्सट्रेटर मशीनची भेट

दापोली:- चिखलगाव ग्राम पंचायतीला साई समर्थ सामाजिक संस्था अंधेरी मुंबई कडून देण्यात आलेल्या ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरण सुपूर्त करण्याचा कार्यक्रम आज चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाला दापोली पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई, माजी सभापती चंद्रकांत बैकर, सरपंच दिनेश आडविलकर, उप सरपंच जयवंत जाधव, साई समर्थ सामाजिक संस्था मुंबई अंधेरीचे अध्यक्ष प्रकाश कानसे, सचिव सुनिल कानसे, ग्रामीण कमेटीचे सर्वश्री गजानन बेर्डे, सुरेंद्र बेर्डे, मनोहर जोशी, संजय गोरीवले, शांताराम बडबे, ग्राम पंचायत सदस्य उदय रेवाळे, गणेश चिपटे, रोहीणी तेलप संघवी शिगवण, ग्रामसेवक दिनेश मर्चंडे आदी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*