खेड – लोटे (lote) येथील सुप्रसिद्ध घरडा (Gharda) केमिकल्सनं कोरोना (corona) रूग्णांच्या बाबतीत रेकॉर्डच केला आहे. आतापर्यंत घरडाचे 98 रूग्ण पॉझिटिव्ह (positive) सापडले आहेत.

घरडामध्ये अजूनपर्यंत कामगारांची ये-जा सुरूच होती. त्यामुळे या कंपनीतून आणखी किती पॉझिटिव्ह निघतील हे सांगता येत नाही. या कंपनीने आपल्या काही कर्मचारी वर्गाचे स्वब पुण्याला तपासणीला पाठवले आहेत. रत्नागिरी येथील सिव्हिलमध्ये जेवढे स्वाब पाठवले जातात तेवढे आपल्या कोविड सेंटर मधून तपासले जात आहेत. तर काही कोविड बाधित लोक कळंबणी येथे दाखल आहेत.

संजय कदम, माजी आमदार

लोटे येथील घरडा कंपनी ही कोरोना हॉटस्पॉट बनली असून ही कंपनी तात्काळ बंद करावी अशी मागणी खेड-दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी केली आहे. ज्यावेळी या घरडा कंपनीत प्रथम कोरोना बाधीत सापडला त्याच वेळेला जर ही कंपनी बंद केली असती तर घरडा कंपनी हॉटस्पॉट ठरली नसती असे त्यांनी सांगितले. त्यामुळे घरडा कंपनी सुरू राहण्यासाठी किंवा घरडा कंपनी बंद पडू नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केले अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

वैभव खेडेकर, मनसे नेता

मनसे नेते वैभव खेडेकर यांनीही घरडा कंपनी विरोधात जोरदार आवाज उठवला होता. त्यांनी या सर्व मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारालाही दिला होता. त्यानंतर पोलीसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. पोलीसांनी किती नोटीबा दिल्या तरी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर वैभव खेडेकर ठाम आहे.