मुंबई:- सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात वाढ करण्यात आली. पेट्रोल दरात लिटरमागे २७ पैशांची तर डिझेल दरात २३ पैशाची वाढ करण्यात आली आहे. ताज्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल दराने ९६ रुपयांची पातळी ओलांडली असून डिझेलचे दर ८६.९८ रुपयांवर गेले आहेत. दिल्लीत पेट्रोल आता ९६.१२ रुपयांवर गेले असून महाराष्ट्रात इंधन दर वाढीचा भडका सुरूच आहे. पेट्रोल दरात पुन्हा वाढ झाल्याने मुंबईत पेट्रोल १०२.३० रुपयांवर पोहोचले असून डिझेलचे दर ९४.३९ रुपयांवर गेले आहेत.