१५ ते २१ जानेवारी या दरम्यान रत्नागिरीसह पाच जिल्ह्यांत व्याघ्रगणना सुरू

रत्नागिरी:- जंगलामध्ये वाघांची संख्या नेमकी किती आहे, या संख्येमध्ये किती वाढ झाली आहे, याबाबतची माहिती मिळवण्याकरिता दर चार वर्षांनी होणारी व्याघ्रगणना यावर्षी १५ ते २१ जानेवारी यादरम्यान होणार आहे. एकूण पाच जिल्ह्यांमध्ये ही व्याघ्रगणना होणार आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. यासाठी सिंधुदुर्ग वन विभागाने पथके तयार केली आहे. ही पथके दर दोन कि.मी.च्या जंगल परिसरामधील निरीक्षणे नोंदवणार आहेत. वाघांसह मांसभक्षी, तृणभक्षी तसेच त्यांच्या अधिवासाचे संनियंत्रण करण्यासाठी ही भारतीय ग्रह प्रगणना आयोजित केली आहे. ही गणना संपूर्ण देशभरामध्ये होणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*