
नारायण खोराटे यांच्या उपस्थितीत कारवांचीवाडी येथे शेकडो कामगारांची आरोग्य तपासणी
रत्नागिरी: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि बांधकाम कामगार सहाय्यक संघाच्या वतीने आपल्या लाडक्या नेत्याला, अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कारवांचीवाडी, आदिशक्ती नगर येथील माऊली बिल्डिंगमधील राज्याच्या हेड ऑफिसमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी केवळ शोकसभा न ठेवता, कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत ‘मोफत आरोग्य शिबिर’ राबवण्यात आले.

यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण खोराटे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाला संघटित कामगार विभागाच्या कार्याध्यक्ष कविता नार्वेकर, कारवांचीवाडीच्या सरपंच नम्रता जोशी, असंघटित कामगार विभागाचे पदाधिकारी आणि संघटनेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“नेत्याला श्रद्धांजली वाहतानाच त्यांच्या विचारानुसार समाजातील कष्टकरी वर्गाची सेवा करणे हाच आमचा उद्देश आहे,” असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

Leave a Reply