केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी भेट घेतली व कोकणातील महामार्गासह महत्वाच्या रस्ते प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील माणगांव, महाड, पोलादूर तालुका व रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात भूसंपादनाच्या समस्येमुळे मुंबई-गोवा एनएच-६६ च्या चौपदरीकरणाच्या कामावर परिणाम होत आहे. डिसेंबर २०२० पासून निधी वितरण प्रक्रिया थांबली असून यामुळे कामाच्या प्रगतीवर परिणाम झाला आहे. हे ना. गडकरींच्या खा. तटकरे यांनी लक्षात आणून दिले.