मुंबई – देशातील एकूण किमान चाळीस कोटी नोकरदारांकडे क्रेडिट कार्डे आहेत किंवा त्यांनी बॅंकांकडून क्रेडिट म्हणजेच कर्जे घेतलेली आहेत. अशा वर्गाला तांत्रिक भाषेत क्रेडिट ऍक्टिव्ह असा शब्दप्रयोग वापरण्यात येतो. देशातील क्रेडिट संस्था आता यामुळे सॅच्युरेशन लेव्हला पोहोचल्या असल्याने त्यांना आता या क्षेत्रासाठी नवीन ग्राहक मिळवणे त्यामुळे जिकरीचे बनले आहे. ट्रान्सयुनियन सिबील संस्थेकडून ही माहिती जारी करण्यात आली आहे. जानेवारी 2021 पर्यंतच्या पाहणीनुसार देशातील एकूण नोकरदार लोकांची संख्या 40 कोटी 70 लाख इतकी आहे. देशातील क्रेडिट कार्डाचे मार्केट हे 20 कोटी लोकांचे असेल असा अनुमान काढला गेला आहे. या पाहणीनुसार जवळपास सर्वच नोकरदारांनी कर्जे काढली आहेत किंवा क्रेडिट कार्डांचा वापर करून त्यांनी उधारीवर पैसा वापरला आहे. आता या वर्गाला पुन्हा बॅंकांकडून कर्जे घेण्याची मुभा कमी असल्याने यापैकी अनेकांनी खासगी सावकारांकडून कर्जे घ्यायला सुरुवात केली आहे, असेही एक अनुमान यातून काढला जात आहे.