रत्नागिरी : कोव्हीड – 19 प्रादुर्भावाच्या काळात केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत गरिबांना पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती. गेल्या सव्वा वर्षापासून सुरू असलेल्या या योजनेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना मार्च 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. आता केंद्र शासनाने योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2021 पासून मार्च 2022 पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आहे त्याच दरात अत्यावश्यक वस्तू मिळणार आहे. त्यामुळे बर्‍याच कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. अजून जवळजवळ चार महिने नागरिकांना गहू आणि तांदूळ हे मोफत दिले जाणार आहे. मार्च 2022 पर्यंत आहे त्याच दरात या अत्यावश्यक वस्तू रेशन दुकानातून करण्याच्या सूचना प्रशासनाने पुरवठा विभागांना दिल्या आहेत.