वादळग्रस्थ भागाचा दौरा करणार, भाजपा ऑक्सिजन बँक प्रोजेक्ट लोकार्पण
महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस वादळग्रस्थ भागाचा दौरा करण्यासाठी रत्नागिरी मध्ये दि 20 मे रोजी येत असून हातखंबा,मालगुंड तसेच मिरकरवाडा परिसरात वादळात नुकसान झालेल्या परिसराला भेट देणार असून भाजपा व अंत्योदय प्रतिष्ठान च्या ऑक्सिजन प्रोजेक्ट लोकार्पण करणार आहेत अशी माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली त्यांच्यासह आ. प्रसाद लाड आमदार रवींद्र चव्हाण हेही दौऱ्यात सहभागी असतील. भाजपा आणि आ. प्रसाद लाड यांनी सीएसआर मधून मदत उपलब्ध केलेल्या कोव्हिडं परकार हॉस्पिटल ला देवेंद्रजी भेट देणार आहेत.
जिल्हा अधिकारी यांचे सहबैठक करतील आंबा बागेतदारांची भेट घेऊन त्यानंतर राजापूर येथे वादळग्रस्थ भागाला भेट देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील