प्रथमच दोन महिला जवानांची हेलीकॉप्टर पायलटच्या प्रशिक्षणासाठी निवड

नाशिक – भारतीय लष्कारातील दोन महिला अधिकाऱ्यांची हेलीकॉप्टर पायलटच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. राज्यातील नाशिक येथील कॉम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूल येथे पहिल्यांदाच हेलीकॉप्टर पायलटच्या रूपात प्रशिक्षणासाठी दोन महिला अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. भारतीलय लष्कराकडून बुधवारी ही माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत महिला अधिकाऱ्यांना आर्मी एविएशन कॉर्प्समध्ये ग्राउंड ड्यूटीचं काम सोपवलं जात होतं. आर्मी एविएशन कॉर्प्समध्ये पहिल्यांदाच असं होत आहे की, दोन महिला अधिकाऱ्यांना भविष्यात हेलिकॉप्टर उडवण्यासाठी कॉम्बॅट आर्मी एविएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण दिलं जात आहे. पायलट होण्यासाठी कठीण परीक्षेला सामोरं जावं लागत असतं.

भारतीय लष्कराने याबाबत माहिती देताना सांगितलं की, १५ महिला अधिकाऱ्यांनी स्वतःहून आर्मी एविएशनमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र यापैकी केवळ दोन महिला अधिकाऱ्यांचीच पायलट अॅप्टीट्यूड बॅटरी टेस्ट(PABT) आणि मेडिकलसह कठोर निवड प्रक्रियेनंतर या पदासाठी निवड झाली. नाशिक येथील प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर या दोन्ही महिला अधिकारी २२ जुलैपर्यंत आर्मी एविशनमध्ये कर्तव्यावर रूजू होतील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*