देशातल्या दैनंदिन बाधितांची संख्या प्रथमच लाखाच्याही खाली, मृत्यूंच्या संख्येतही घट!

देशात आता करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या करोनाबाधितांच्या संख्येत तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मोठी घट होत असून करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत आता वाढ होत आहे. काल प्रथमच दैनंदिन करोनाबाधितांची संख्या एक लाखाच्याही खाली आली आहे.

गेल्या २४ तासांत देशामध्ये ८६ हजार ४९८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली. एका दिवसात एक लाखाहूनही कमी बाधित आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर देशातल्या करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आजही बाधितांच्या संख्येपेक्षा जास्तच आहे. देशात काल दिवसभरात एक लाख ८२ हजार २८२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या १३ लाख ३हजार ७०२ झाली आहे.

करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. काल दिवसभरातल्या देशातल्या मृत्यूंची संख्या २,१२३ इतकी आहे. त्यामुळे देशातल्या करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता तीन लाख ५१ हजार ३०९वर पोहोचली आहे.

देशात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. गेल्या २४ तासात देशातल्या ३३ लाख ६४ हजार ४७६ नागरिकांनी लस घेतली. त्यापैकी ३० लाख ३८ हजार २८९ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या तीन लाख २६ हजार १८७ इतकी आहे.

करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा सोमवारी केली. नवे धोरण २१ जूनपासून लागू होणार असून, संपूर्ण लसखरेदी केंद्राकडूनच करण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या आर्थिक ओझ्यातून राज्यांची मुक्तता होणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*