दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी
कृषि विभागामार्फत अभ्यास दौऱ्याचे आयोजन

रत्नागिरी : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२१-२२ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रम या घटकांतर्गत तालुका दापोली येथील २५, खेड तालुक्यातील २५, मंडणगड तालुक्यातील १० शेतक-यांसाठी पुणे व बारामती येथे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावरील प्रशिक्षण हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फळबाग, फुले, भाजीपाला लागवड/प्राथमिक प्रक्रिया केंद्र / संरक्षित शेती अंतर्गत ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, इत्यादी घटकांचा लाभ घेतलेले व लाभ घेवु इच्छित असलेल्या शेतकऱ्यांकडुन राज्यांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. महिला वर्ग / अनुसुचित जाती/ अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रति शेतकरी प्रती दिन एक हजार रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी शासनामार्फत खर्च करण्यात येईल. या पेक्षा अतिरिक्त खर्च झाल्यास शेतकऱ्यांकडुन वाढीव खर्चाची रक्कम आकारण्यात येईल. प्रशिक्षणार्थीची भोजन व निवास व्यवस्था उपविभागीय कृषि अधिकारी पुणे व उपविभागीय कृषि अधिकारी बारामती यांच्या समन्वयाने करण्यात येईल.

प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय पुणे, कृषि विज्ञान केंद्र बारामती, राष्ट्रीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था माळेगांव, खजुर लागवड, शेततळे- मत्स्य पालन, कृषि पर्यटन, देशी गाई मुक्तगोठा पद्धत, दुग्धप्रकिया संस्था, केळी लागवड, अंजीर प्रक्रिया उदयोग, शीतगृह, विविध प्रक्रिया उदयोग, हळद पावडर युनिट, इत्यादी पारंपारिक पिक पद्धती बरोबरच नविन विकसित तंत्रज्ञानाचीही माहिती देण्यासाठी कृषि विज्ञान केंद्राबरोबरच प्रगतशील शेतक-यांच्या शेतावर भेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

दापोली, खेड, मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिनांक २१ फेब्रुवारी ते २५ जानेवारी २०२२ या कालावधीत प्रशिक्षण दौ-याचे आयोजन करण्यात आले असून या संधीचा इच्छुक शेतक-यांनी नविन तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दिशांत कोळप यांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*