1 जून पासून मासेमारी बंदी राहणार

रत्नागिरी दि. 07 : चालू वर्षी 01 जुन 2021 ते 31 जुलै 2021 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस ) पावसाळी मासेमारी बंदी कालावधी लागू करण्यात येत आहे.

तरी सर्व मासेमारी नौका मालक व सर्व मच्छीमार यांनी 01 जुन 2021 पूर्वी मासेमारीस गेलेल्या नौका 01 जुन 2021 नंतर कोणत्याही परिस्थतीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी असणार नाही व अशा नौका महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत कारवाईस पात्र राहतील. त्यामुळे आपल्या संस्थेतील सर्व संबधित नौका 31 मे 2021 वा तत्पूर्वी बंदरात पोहचतील याबाबत नौका मालकांना सूचित करण्याची जबाबदारी आपली राहील. तसेच मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक नौकाद्वारे व कोणत्याही अवैध मासेमारी होणार नाही. तसेच कोणतीही यांत्रिक नौक कोणत्याही कारणास्तव समुद्रात जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी असे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रत्नागिरी यांनी कळविले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*