दापोली :- दापोली, मंडणगड, गुहागर संघर्ष समिती व हर्णै बंदर कमिटी यांच्यावतीने मच्छीमारांच्या प्रमुख मागण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सुधारित मासेमारी अधिनियम 1988 च्या कायद्याची अंमलबजावणी करणे, मासेमारी व्यवसायासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करणे, डिझेल परतावा लवकर मिळावा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले. या आंदोलनात मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सहायक मत्स्य व्यवसाय कार्यालय आयुक्त रत्नागिरी यांना पदावरून बडतर्फ करणे, मासेमार स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करणे, डिझेल परतावा लवकर मिळावा यासह आदी प्रमुख मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. हर्णेै बंदर जेटीचे लवकरात लवकर काम मंजूर करणे, 120 एचपीच्या वरच्या लोकांना डिझेल परताव्यात समाविष्ठ करणे, शासनाने मच्छी दुष्काळ जाहीर करावे, समुद्रातील परप्रांतीय फास्टर बोटींना मत्स्यव्यवसाय खात्यामार्फत पकडण्यात यावे, मच्छीमारांचे कर्ज माफ करावे आदी मागण्या देखील करण्यात आल्या.