विनापरवानगी सभा व मोर्चा प्रकरणी पोलीसांकडून गुन्हा दाखल
रत्नागिरी : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मनाई आदेशाचा भंग करून तसेच विनापरवानगी शुक्रवारी ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने सभा व मोर्चा आयोजित केला.याप्रकरणी ओबीसी समन्वय समितीचे प्रमुख व आयोजकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरदचंद्र गिते, कुमार शेट्ये, संतोष सोलकर, प्रकाश साळवी, नंदकुमार मोहिते, राजीव किर, दीपक राऊत, तानाजी कुळये, सुजित झिमण, संतोष थेराडे, अविनाश लाड, संदीप राजपुरे, रघुवीर शेलार व अन्य जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांनी ओबीसी समन्वय समितीच्या न्याय हक्कासाठी व मागण्यांसाठी ६ ते ७ हजार लोकांचा जमाव गोळा केला. तसेच यासाठी कोणतीही परवानगी न घेता सभा आणि मोर्चा आयोजित करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो हे माहित असूनही हयगयीची कृती केली होती. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.