घरडा केमिकल्स लि. कंपनीच्या व्यवस्थापनावर हलगर्जीपणाचा ठपका, गुन्हा दाखल

खेड : लोटे एमआयडीसीतील घरडा केमिकल्स कंपनीत 22 मार्च रोजी अपघात घडला होता. यामध्ये १) बाळासाहेब रामचंद्र गाढवे, वय ४९, रा.खेर्डी माळेवाडी ता. चिपळुण, जि. रत्नागिरी, २) महेश महादेव कासार वय २६, रा. भरणे ता. खेड, मुळ रा. घारी, ता. पोलादपूर, जि. रायगड, ३) आशिष चंद्रकात गोगावले, वय.३१, रा. भागडीशिरळ, ता.चिपळुण, जि. रत्नागिरी, ४) राजेश फकिरा मानतकर वय ३९, रा.घरडा कॉलनी लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी आणि ५) अभिषेक सुरेश कवडे रा.पागमळा, ता. चिपळुण जि. रत्नागिरी या 5 कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये   व्यवस्थापन यांनी मयत इसम यांना सुरक्षिततेची आवश्यक साधने न पुरविता प्लान्ट नं.०७ बी येथील रिअॅक्टर नं. आर. ७८०९ याठिकाणी अत्यंत घातक अशा रसायनामध्ये हयगयीने व निष्काळजीपणे त्यांच्याकडून काम करुन घेतल्याचा ठपका व्यवस्थापनावर ठेवण्यात आला आहे.

तसेच आग लागलेली घटना घडली त्याठिकाणी मयत झालेल्या इसमांना बाहेर पडण्यासाठी कोणताही आपत्कालीन मार्ग उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांना आगीच्या ठिकाणाहुन बाहेर पडता आले नाही व त्यांचा १०० टक्के भाजून मृत्यू झालेला आहे. तसेच विद्युत निरीक्षण विभाग रत्नागिरी यांनी दिलेल्या अहवालानुसार देखील कंपनी व्यवस्थापनचा हलगर्जीपणा दिसून येत आला म्हणून घरडा केमिकल्स लि. कंपनीचे प्रोडक्शन हेड, पी. बी. पाटील इलेक्ट्रीकल हेड, व्ही. बेंजामिन व सेफ्टी हेड आणि एम.व्ही.मालगट्टे यांच्या विरोधात भा.दं.वि.क. ३०४ (अ), ३३८, २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याय आला आहे. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*