दापोली पंचायत समितीत अधिकारी-कर्मचारी यांच्यात हाणामारी

दापोली : दापोली पंचायत समिती विभागातील कृषीधन पर्वेक्षक आणि वाकवली पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी यांच्यातील तोंडी वादविवाद शेवटी हाणामारीत दिसून आला.

यात कर्मचारी रक्तबंबाळ झाला शेवटी या वादावर दापोली पंचायत समिती गटविकास अधिकारी रूपा दिघे यांनी दोघांकडून लेखी घेत घडल्या प्रकारावर पडदा टाकला.

या हनामारीची चर्चा मात्र दापोली पंचायत समितीत चांगली रंगली आहे. दि 23 रोजी सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.

कृषीधन पर्वेक्षक विभागात दुपारी जोरजोरात ओरडा ओरड झाली या वेळी पंचायत समिती विभागातील अनेक कर्मचारी आणि कामांसाठी आलेल्या नागरिकांची धावाधाव झाली.

या वेळी काही पत्रकार देखील पंचायत समितीत कामा निमित्त आले होते. या वेळी जोरजोरात ओरड झाल्याने पत्रकारांनी हा विषय जाणून घेतला.

तर कर्मचारी रक्तबंबाळ का झाला अशी विचारणा केली. या वेळी काही कर्मचारी यांनी त्याला हातातील घड्याळ लागले अशी सारवासारव करत घडल्या प्रकारावर पडदा टाकला.

ADVERTISE

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*