पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.