दापोली- कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दापोली तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या व वाढत्या तापमानामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना सोयीस्कर आराम व विश्रांती मिळावी याकरिता जेसीआय दापोली व काही दात्यांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षातील एकूण ९ पंखे( Pedestal Fan) ५ ऑक्सिमिटर देण्यात आले.

या अतिशय गंभीर व संकटसमयी आपण आपली जबाबदारी ओळखून शक्य ती मदत एकमेकांस केली पाहिजे आणि या उद्देशाने जेसीआय दापोली या संस्थेने पुढाकार घेत रुग्णांना आवश्यक वस्तू अत्यंत अल्पावधीतच उपलब्ध करून दिल्या.

या विशेष उपक्रमासाठी जेसी प्रमोद जैन, जेसी आशिष अमृते, जेसी रित्विक बापट, जेसी ऋषिकेश मालू, जेसी डॉ सुयोग भागवत, जेसी फराज रखांगे, जेसी मयूर मंडलिक, जेसी अतुल गोंदकर, जेसी अभिजित रेळेकर, जेसी मयुरेश शेठ, जेसी प्रसाद दाभोळे, पंचनदी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सुनील देसाई, व जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी कुणाल मंडलिक यांनी सढळ हाताने मदत केली.

या कार्यक्रमास जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी कुणाल मंडलिक, सचिव जेसी अतुल गोंदकर, जेसी रित्विक बापट, जेसी रमेश जोशी, जेसी मयुरेश शेठ, जेसी प्रसाद दाभोळे, जेसी सिद्धेश शिगवण,जेसी डॉ.कुणाल मेहता व उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी श्री. गीते, श्री. सावर्डेकर उपस्थित होते.

या उपक्रमासाठी डॉ. महेश भागवत, जेसी डॉ. सुयोग भागवत व जेसी डॉ. कुणाल मेहता यांचे विशेष सहकार्य लाभले. जेसी डॉ. कुणाल मेहता यांनी जेसीआय दापोली या संस्थेने केलेल्या अमूल्य मदतीबद्दल उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.