दापोली : फेक इंस्टाग्राम अकाऊंट वरून दापोलीतील एका तरुणीला व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करणाऱ्याच्या दापोली पोलिसांनी मुस्क्या आवडल्या आहेत. पुण्यतून त्याला दापोली पोलीसांच्या पथकाने 32 वर्षांच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

सोशल मीडिया वरील वावर असणाऱ्या तरुणांमध्ये इंस्टाग्राम हे जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या ॲप पैकी एक आहे.

दिनांक 11/09/2023 रोजी, दापोली पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीला तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर एक फ्रेंड रिक्वेस्ट आल्याने व फ्रेंड रिक्वेस्ट मधील व्यक्ति ही आपलीच मैत्रीण असल्याने तिने लगेच ती स्वीकारली.

काही वेळातच दोघांमध्ये संदेशांची देवाणघेवाण ही झाली.
याच इंस्टाग्राम अकाऊंट वरून तिला थोड्या वेळाने एक व्हिडिओ कॉल आला व या कॉल मध्ये एक अज्ञात इसम आपला चेहरा न दाखवता, अर्धनग्न शरीर दाखवत अश्लील चाळे करून दाखवत असल्याचे दिसले.

थोड्याच वेळात याच इंस्टाग्राम अकाऊंट वरून या तरुणीचे तसेच या अज्ञात व्यक्तीचे बनावट फोटो (Morphed Photo) तिला व तिच्या इतर इंस्टाग्रामवरील मित्र मैत्रिणींना पाठविण्यात आले व सर्व बनावट फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याबाबत धमकावण्यात ही आले.

या तरुणीने वर घडलेला प्रकाराबाबत आपल्या मैत्रिणीच्या मोबाइल नंबर वर कॉल केले असता तिला लक्षात आले की, बनावट अकाऊंटवरून आपली मोठी फसवणूक झालेली आहे.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दापोली पोलीस ठाणे येथे या तरुणीने या अज्ञात इसमा विरोधात व बनावट इंस्टाग्राम अकाऊंट बाबत तक्रार दिली.

या तक्रारीची लागलीच दखल घेत दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 170/2023 भा.द.वि.संहिता कलम 354(अ)(1)(3), सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 सुधारित 2015 चे कलम 66(C), 67(A) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास दापोली पोलीस ठाणे पथकामार्फत व तांत्रिक तपास सायबर पोलीस ठाण्या मार्फत सुरू करण्यात आला.

हा गुन्हा हा सायबर पोलीस ठाणे यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उघडकीस आलेला आहे. तसेच या गुन्ह्यामधील आरोपी रमेश भागोजी कोरके, वय 32 वर्ष रा. कोरकेवाडी कोलतावडे, ता. आंबेगाव जिल्हा पुणे, याला दापोली पोलीसांमार्फत आज रोजी ताब्यात घेण्यात आलेले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांचे योग्य सूचनेनुसार पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पोलीस उप निरीक्षक ज्योती चव्हाण, पोलीस हवालदार शिवलकर व पोलीस शिपाई सातार्डेकर यांनी केलेला आहे.

Instagram, facebook सारख्या सोशल मीडिया वरील मध्यमांचा वापर करताना तरुणांनी कोणत्याही अज्ञात विनंत्या अथवा लिंक्स क्लिक करू नयेत.
आपल्या अकाऊंट Settings & Privacy या नियमित अद्ययावत कराव्यात तसेच ईमेल किंवा संदेशांद्वारे फिशिंगच्या प्रयत्नांपासून सावध रहा.
संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा.

– धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.