मुलीचे बनावट इन्स्टग्राम अकाऊंट तयार करून बदनामी करणाऱ्या तरुणाला बेळगाव मधून अटक

खेड : तालुक्यातील तरुणीचे बनावट अकाऊंट तयार करून त्यावर फोटो व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी कर्नाटक बेळगाव येथून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

प्रतीक तानाजी चौगुले ( वय २५ रा. भिडे कॉलनी, नॅशनल हायवे, यमगडणी, ता. चिकोडी बेळगांव ) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक चौगुले हा फिर्यादी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अज्ञात अकाऊंटवरून रिक्वेस्ट पाठवून फिर्यादी जवळ जवळीक साधत होता.

काही काळाने सदर इन्स्टाग्राम अकाऊंट बनावट असल्याचे लक्षात येताच त्याने हे अकाउंट बंद केले.

याचा राग मनात धरून आरोपी चौगुले याने फिर्यादी यांचा बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार जरून त्यांचे फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर प्रसारित करण्याची धमकी दिली.

या प्रकरणी त्याच्याविरुद्ध भा. द. वी. कलम ३५४ ड, ५०४, ५०६,५०७ आयटी ऍक्ट ६६ क, ६६ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पो. नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे, पोलीस शिपाई अजय कडू, वैभव ओहोळ यांनी केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*