नवी दिल्ली: भारतात फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट आपोआप लॉग ऑऊट झाले होते. त्याचं काय कारण आहे हे काही समजू शकलो नाही. ही घटना फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात घडली होती. ही घटना का घडली याचा खुलासा फेसबुकने अद्यापही केलेला नाहीये.

जगभरातली लोकं आपापल्या मित्रांना, आप्तेष्टांना फोन करून फेसबुक बंद पडला आहे का? अशी विचारणा करू लागले होते. काहींना वाटत होते की आपला फेसबुक अकाउंट हॅक झालेला आहे.

संपूर्ण जगामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण फेसबुक पुन्हा एकदा सुरू झाल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास  घेतला आहे.

वापरकर्त्यांना मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड असे मॅसेज येत होते. वारंवार प्रयत्न करूनही खातं उघडलं जात नव्हत.

मेटा मालकीचे Facebook आणि Instagram, दोन्ही लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म का बंद पडले होते याची उत्सुकता सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
देशभरातील वापरकर्ते आता फेसबुकवर पुन्हा एकदा लॉगिन होत  आहेत.

फेसबुक डाउन आणि इंस्टाग्राम डाउन हे हॅशटॅग देखील X (पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जात होते) वर ट्रेंड करत आहेत.

जगभरातील 77 टक्क्यांहून अधिक ॲप्लिकेशन वापरकर्त्यांनी लॉग आऊटची समस्या नोंदवली होती. तर 21 टक्के वापरकर्त्यांनी वेबसाइटवर समस्या नोंदवली होती.

8.52 वाजता 18,000 हून अधिक वापरकर्त्यांनी इंस्टाग्राम डाउनची तक्रार नोंदवली.
72 टक्क्यांहून अधिक वापरकर्त्यांनी ॲप्लिकेशनमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार नोंदवली,
तर 20 टक्क्यांहून अधिक वापरकर्त्यांनी लॉगिनमध्ये समस्यांची तक्रार नोंदवली.

आता फेसबुक आणि instagram पुन्हा एकदा सुरू झाल्याने सर्व वापरकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मार्क झुकरबर्ग यांनी आपली अधिकृत भूमिका याबद्दल जाहीर करावी अशी मागणी सुद्धा काही युजर्सने ट्विटरच्या माध्यमातून म्हणजेच एक्स च्या माध्यमातून केली आहे.