राष्ट्रवादीचे काँग्रेस जिल्हा चिटणीस माजी तालुकाध्यक्ष सचिन उर्फ बबलूकोतवडेकर शिवसेनेत

पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी: शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा चिटणीस, माजी तालुकाध्यक्ष आणि कुवारबावचे माजी सरपंच सचिन उर्फ बबलू कोतवडेकर यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

रत्नागिरी राजकीय भूकंप होत असून रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या कामावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत श्री. कओतवडएकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

गावाच्या विकासासाठी आम्ही पालकमंत्री यांचे नेतृत्व स्वीकारून तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया बबलू कोतवडेकर यांनी दिली आहे.

या प्रवेशा दरम्यान किरण उर्फ भैय्या सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुका प्रमुख बाबू म्हाप, युवा सेना तालुका प्रमुख तुषार साळवी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*