गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.तसेच ब्रीच कँडीच्या मॅनेजमेंटला त्यांनी विनंती केली की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसंदर्भातील सर्व अपडेट माध्यमांना द्यावेत. तसेच मॅनेजमेंट आणि मंगेशकर परिवार एकत्रित चर्चा करून आरोग्य विषयक माहिती माध्यमांना देतील, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आलं आहे.
लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. त्या अजूनही आयसीयूमध्ये आहेत