मुसळधार पडणाऱ्या पावसात मुंबई गोवा महामार्गाच्याचौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य

रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षे चालू आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी आजूबाजूची माती रस्त्यावर येण्याचे प्रकार घडत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर निवळी येथे रात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळल्याने महामार्ग सुमारे काही तास बंद होता. मात्र आता दरड हटविण्यात आली असून मार्ग सुरळीत करण्यात आला आहे.तरीदेखील या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनांना काळजीपूर्वक मार्गक्रमण करावे लागत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*