रत्नागिरी : शहर पोलिसांनी शिरगाव येथील बंद असलेल्या भाजीच्या दुकानाच्या समोरील महावितरणच्या पोल जवळ दोन इसम अंमली पदार्थ बाळगल्याच्या स्थितीत आढळून आल्याने कारवाई केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील परटवणे ते गणपतीपुळे जाणाऱ्या रोडवर बाणखिंड, शिरगाव येथील बंद असलेल्या मधुरा भाजी सेंटर समोरील महावितरणच्या पोल जवळ आरोपी नंबर १) हुजेफा अब्दुल हमीद साखरकर याने आपल्या ताबे कब्जात ब्राऊन हेरॉईन उग्र वासाचा अंमली पदार्थ एकूण ७.०० ग्रॅम निव्वळ वजनाचा व प्लॅस्टिकच्या पाऊचसह ९.०० ग्रॅम वजनाचा व आरोपी क्रमांक २) मुसेब अब्दुल हमीद साखरकर याने आपल्या ताब्यात गांजा अंमली पदार्थ त्याचे निव्वळ वजन ११८ ग्रॅम असून प्लॅस्टिक पाऊचसह वजन १२६ ग्रॅम असे अंमली सदृश्य पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने गैरकायदा स्वतः जवळ बाळगल्याच्या स्थितीत आढळून आले.
सदर कारवाईत १) १,१०,०००/- रुपये किंमतीची एक पारदर्शक प्लास्टीक पाऊच त्यामध्ये एकुण १६८ कागदी पुड्यांमधील खाकी रंगाचा ब्राऊन हेरॉईन उग्रवासाचा अंमली सदृश्य पदार्थ असुन, त्याचे निव्वळ वजन ७.०० ग्रॅम असून प्लास्टीक पाऊचसह वजन ९.०० ग्रॅम आहे. २) २,२०० /- रुपये रोख रक्कम, ३) ५०,००० /- रुपये किमतीची काळ्या व लाल रंगाची यामाहा कंपनीची रेझेड आर मॉडेलची दुचाकी स्कुटर असलेली तिचा नंबर एम.एच.०८. एजे. ५४०६ किंमत सुमारे. ४) १२००/-रुपये किंमतीची एक पारदर्शक प्लास्टीक पिशवी त्यामध्ये हिरव्या काळ्या रंगाचा उग्र वासाचा पाला, फुले, काडया, बोंडे असलेला उग्र वासाचा गांजा अंमली सदृश्य पदार्थ असून, त्याचे निव्वळ वजन ११८ ग्रॅम असुन प्लास्टीक पाऊचसह वजन १२६ ग्रॅम असुन त्याची किं.सु. असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा रत्नागिरी शहर पोलिस ठाणे येथे दिनांक ३ ऑक्टोबर रोजी गुन्हा रजिस्टर नंबर ३७०/ २०२३ मध्ये एन. डी. पी. एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २०(ब)(ii)(A), २२(ब), २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.