नवशी फाटा येथे दागिने चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र तयार

दापोली:- दापोली तालुक्यात नवशी फाटा येथे महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र दापोली पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. उपरोक्त विषयान्वये, दापोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४०/२०२१ भा.द.वि.सं.क ३९२,५०६ प्रमाणे दिनांक १६/०३/२०२१ रोजी सकाळी ११.१५ वा. ते ११.३० वा. चे सुमारास कुंभवे गाव हद्दित म्हातारीचे वाकण येथे नवशीकडे जाणाऱ्या रोडवर घडलेला आसून दिनांक १६/०३/२०२१ रोजी १६.५५ वा. दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास एन.एम. कांबळे, पोलीस उपनिरीक्षक, दापोली पोलीस ठाणे यांनी केलेला असून तपास चालू आहे. प्रकरणाची थोडक्यात हकिगत अशी कि, वरील तारखेस वेळी व जागी यातील फिर्यादी सौ. संगिता विजय पाटील, रा. कुंभवे नर्सरी ता. दापोली ह्या नवशी फाटा ते नवशी असे चालत जात असताना नवशी फाट्यापासून सुमारे ३०० मीटर अंतर चालत गेल्यावर रोडवर कोणी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्याच्या घळ्यातील एक तोळे वजनाचा सोन्याचा सर व अर्धा तोळे वजनाची सोन्याची चैन असे सुमारे ७०,४००/- रु किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेलेले आहेत. त्याबाबत फिर्यादी सौ. संगिता विजय पाटील यांनी फिर्याद दिलेवरून दापोली पोलीस ठाणे येथे सदरचा गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या झाले तपासामध्ये अज्ञात आरोपीत याचे रेखाचीत्र काढण्यात आलेले आहे. अज्ञात आरोपीत याचे काढण्यात आलेले रेखाचित्राचा फोटो प्रसिद्धि माध्यमांकडे देण्यात आला असुन या रेखाचित्राच्या आधारे दापोली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*