रत्नागिरी शासकीय अध्यापक महाविद्यालयच्या प्रचार्यपदी डॉ. राजश्री देशपांडे रुजू

रत्नागिरी: डॉ. राजश्री देशपांडे यांची रत्नागिरीतील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या (बी.एड.) प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. रत्नागिरीतील विविध मान्यवरांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे.

डॉ. देशपांडे या १९९१ च्या बॅचच्या प्राध्यापक असून त्यांनी यापूर्वी कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. तसेच सोलापूर विभाग सोलापूर येथे सहसंचालक उच्च शिक्षण या पदावर देखील त्यांनी काम केले आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून यांनी विविध समित्यांवर काम केले आहे. त्यांनी अध्यापक महविद्यालयात अनेक उपक्रम राबविले आहे. आजही अनेक शाळामध्ये त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहे.

यापूर्वी रत्नागिरी बी.एड.महाविद्यालयास NAAC -ब+ मानांकन मिळवून दिले आहे. उद्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयास ISO मांनाकनासाठी पडताळणी होणार आहे.

डॉ. राजश्री देशपांडे यांचं महाविद्यालयातील प्रध्यापकानी स्वागत केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*