दापोली: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण, डॉ. राजेश ठोकळ यांच्या परवानगीने डॉ. राकेश जाधव, सहाय्यक प्राध्यापक यांनी ‘टेक्नोलॉजी फोरकास्टिंग अँड फोरसाईट मेथड्स इन अॅग्रिकल्चरल अँड अलाइड सेक्टर’ या प्रशिक्षण कार्यक्रमात 3 ते 7 फेब्रुवारी 2025 दरम्यान भाग घेतला.

या प्रशिक्षणाचे आयोजन I CAR नॅशनल ऍकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (ICAR-NAARM) हैदराबाद, तेलंगणा यांनी केले होते.

या प्रशिक्षणात त्यांनी धोरणात्मक नियोजन आणि संशोधन प्रणालीचे व्यवस्थापन याचे ज्ञान प्राप्त केले.

या कार्यक्रमामुळे संस्थात्मक संशोधन उपक्रमांना आधुनिक प्रगती व नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळेल आणि त्या ज्ञानाचा फायदा डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला होईल.

तसेच, या क्षेत्रातील योगदानाला अधिक बळकटी मिळेल. डॉ. राकेश जाधव यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

ICAR-NAARM मधील हा सहभाग डॉ. जाधव यांच्यासाठी खूप मोलाचा अनुभव ठरला, ज्यामुळे त्यांना ज्ञान आणि संशोधन उपक्रमांना चालना देण्याची संधी मिळाली.

या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे प्राचार्य डॉ. आशिष मोहिते यांनी विशेष प्रयत्न केले.