दापोली : येथील आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशन संचलित न. का. वराडकर कला, रा. व्ही. बेलोसे वाणिज्य व कै. शांतिलाल जैन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. भारत कऱ्हाड यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.
डॉ. भारत कऱ्हाड हे यापूर्वी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे वित्त व लेखा अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांनी शनिवार दि.०५ मार्च २०२२ रोजी प्राचार्य पदाचा रितसर कार्यभार स्वीकारला आहे.
आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनच्या सभापती जानकी उदय बेलोसे यांनी डॉ. भारत कऱ्हाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी प्रभारी प्राचार्य- डॉ. सुरेश निंबाळकर, प्रा. सुवर्णा कऱ्हाड, अधिक्षक श्री नंदकुमार जोशी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. भारत कऱ्हाड यांना शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असून यापूर्वी त्यांनी बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे अध्यापन, व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे वित्त व लेखा अधिकारी या प्रशासकिय पदावर कार्य केले आहे.
डॉ. भारत कऱ्हाड हे चार्टर्ड अकौंटंट असून त्यांनी एम. बी. ए., एम. कॉम., पी. एच. डी., या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत.
डॉ. भारत कऱ्हाड यांचे ३ पुस्तके, २१ रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले असून त्यांनी अनेक ठिकाणी विविध विषयावर व्याख्याने दिली आहेत. तसेच विद्यापीठ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिसंवादात रिसर्च पेपर सादरीकरण व सहभाग घेतला आहे.
जळगाव व अमरावती विद्यापीठ येथे डॉ. कऱ्हाड यांनी अधिसभा, व्यवस्थापन परिषद, खरेदी समिती, वित्त व लेखा समिती, ज्ञान स्त्रोत समिती, राष्ट्रीय सेवा योजना समिती, इमारत व बांधकाम समिती अशी विविध प्राधिकरणे व समित्यांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य म्हणुन काम केले आहे.
त्यांना २००३ साली पुणे विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळाला आहे.
इंद्रधनुष्य, अश्वमेघ व आविष्कार या राज्यपाल कार्यालय आयोजित आंतरविद्यापीठ महोत्सवासाठी नियुक्त वित्तीय व्यवस्थापन समितीवरही त्यांनी काम केले आहे.