डॉ. असगर कासम मुकादम यांचा कोकण दौरा: शिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपक्रमांना प्राधान्य

दापोली : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, महाराष्ट्राचे संचालक डॉ. असगर कासम मुकादम यांचा कोकण दौरा नुकताच पार पडला.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी चिपळूण, विसापूर आणि दापोली येथे भेटी दिल्या. शिक्षण आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी गरजू मुलांना आर्थिक मदत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दापोली येथे त्यांनी धावता दौरा करत समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या आणि संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, महाराष्ट्राचे संचालक डॉ. असगर कासम मुकादम यांचा हर्णे येथे ऑगस्ट महिन्यात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे शिवसैनिक वाजिद खान यांनी दिली.

यावेळी बोलताना वाजिद खान यांनी डॉ. मुकादम यांना सांगितले की, दापोलीचे आमदार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हर्णेसाठी 470 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विकासकामे करताना ते कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीत.

ते पुढे म्हणाले, “शिवसैनिक म्हणून आम्ही नेहमीच त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्या कार्याला पाठिंबा देत राहू.”

या प्रसंगी रिझवान काजी, नदीम मुकादम, वसीम खान, इब्राहिम काझी, इमरान फजलानी, यासीर पारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*