ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अब्दुल रहमान वणू यांचं निधन

सामाजिक वसा पुढे घेऊन जाणारे, तरुण मनांना चेतवणारे, ज्येष्ठ समाजसेवक, पर्यावरण प्रेमी, स्वच्छ भारत अभियानचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. अब्दुल रहमान वणू यांची आज प्राणज्योत मालवली.

शिक्षणाच्या बाबतीत डॉ. ए आर वणू प्रचंड आग्रही होते. शिक्षण क्षेत्राला त्यांनी सढळ हस्ते मदत केली आहे. त्यांच्या अचानक जाण्याने समाजामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

डॉ. अब्दुल रहमान वणू आज आपल्यात नाहीयेत यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. त्यांच्या आशा प्रकारच्या अचानक एक्झिटने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. माय कोकण परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!

– मुश्ताक खान
संपादक
माय कोकण

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*