नवी दिल्ली : कोकण रेल्वेला गव्हर्नन्स नाऊ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कोकण रेल्वेला ‘नेतृत्व पुरस्कार’ (Leadership Award) आणि ‘पायाभूत सुविधा नेतृत्व पुरस्कार’ (Infrastructure leadership Award) असे दोन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
गव्हर्नन्स नाऊ यांच्याकडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना सन्मानित केले जाते.
यावर्षीच्या अकराव्या गव्हर्नन्स नाऊ पुरस्कारासाठी कोकण रेल्वेची निवड करण्यात आली.
कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे आणि माजी खासदार सत्यपाल सिंह यांच्या हस्ते कोकण रेल्वेला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा आणि वर्कस डायरेक्टर आर. के. हेगडे यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.