पालकमंत्री ना. उदय सामंत यांची सर्व शिवसैनिक आणि कार्यक्रमांच्या आयोजकांना सूचना

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शिवसैनिक आणि कार्यक्रमांचे आयोजक यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. मला हारतुरे घालू नका, महागडे हार घालू नका, महागडे पुष्पगुच्छ देऊ नका. त्याऐवजी ते पैसे गावातील होतकरू, गरजू विद्यार्थ्यांवर खर्ची करा.

त्यांंच्या शिक्षणासाठी पैसे खर्ची करा. जेणेकरून त्या पैशांचा सुयोग्य विनियोग होईल. त्या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळेल. याची सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यक्रमांचे आयोजक यांनी अंमलबजावी तात्काळ करावी, अशा सूचना ना. उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात ना. उदय सामंत यांचे गावागावात कार्यक्रम होत असतात. यावेळी गावागावात ना. सामंत यांचे मोठ्या दिमाखदार पद्धतीने स्वागत होते.

मोठमोठे हार घातले जातात. महागडे पुष्पगुच्छ दिले जातात. हा खर्च योग्य नाही असे ना. उदय सामंत यांचे मत आहे.

एवढे महागडे हार घालण्यापेक्षा गावातील गरजू विद्यार्थ्याला त्याचे पैसे दिल्यास त्याला एक आर्थिक हातभार मिळेल.

रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये गावात एक कार्यक्रम होता. यावेळी ना. सामंत यांनी हे वक्तव्य केले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

या कार्यक्रम प्रसंगी महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर, उपतालुका प्रमख प्रकाश शिंदे, विभाग प्रमुख शंकर झोरे, महिला विभाग प्रमुख रिया साळवी, विभाग संघटक प्रशांत शेरे, अनंत साळवी, चंद्रकांत साळवी, मनीष साळवी, दत्ताराम साळवी, संदीप साळवी, वैभव नागवेकर, रामप्रसाद किर, प्रभाकर खाडे, सुधारकर खाडे, सुभाष खाडे, गजानन खाडे, राजू नागवेकर, दिवाकर नागवेकर, सत्यवान नागवेकर, प्रथमेश साळवी, ऋषी नागवेकर, निखिल नागवेकर, रोशन खाडे, दीपक कदम, अनिकेत नागवेकर, शैलेश नागवेकर, गावातील ग्रामस्थ, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.