पंढरपूर : लसीच्या वाटपाच्या आकडेवारीमुळे वाटप करताना केंद्राकडून दुजाभाव होत असल्याचे दिसले होते. काल वाटप केलेल्या साडेतीन कोटी लसीमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त साडेसात लाख लसी आल्या आहेत. एप्रिल अखेर महाराष्ट्रातील लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाने केलेले असताना पुरेशी लस मिळणे अपेक्षित आहे. लसीचा तुटवडा असेल तर महाराष्ट्रातील आणि आपल्या देशातील लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय परदेशात लस पाठवू नका अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.