श्वान ‘विराट’च्या मदतीने पोलीसांनी बेपत्ता अल्पवयीन मुलीला जंगलातून शोधले

अलोरे-शिरगाव पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी


चिपळूण : एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी अधून-मधून आपल्या मित्राच्या दुचाकीवरून शाळेला जात येत असल्याच्या कारणावरून मुलीच्या वडीलांनी तिला रागवले.

या कारणावरून घाबरून जाऊन ही अल्पवयीन मुलगी दिनांक 28/09/2023 रोजी 19:00 वा. आपल्या राहत्या घरातून निघून जाऊन पेढांबे येथील घनदाट जंगलात पळून गेली.

आपली मुलगी घरातून निघून गेल्यामुळे व तिचा शोध घेतला असता ती जवळपास कुठेही मिळून न आल्याने लागलीच तिच्या वडीलांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली.

अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर 63/2023 भा.दं.वि संहिता कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या मुलीच्या नातेवाईकांनी तसेच पोलीसांनी जंगलात शोध घेण्याचा प्रयत्न केला पण गुरुवारी रात्री ती मिळून आली नाही. म्हणून आज पुन्हा दिनांक 29/09/2023 रोजी सकाळपासूनच पोलीसांनी शोध मोहीम राबविली परंतु तरीही अल्पवयीन मुलगी मिळून आली नाही.

त्यानंतर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे यांच्याद्वारे लागलीच रत्नागिरी येथे कार्यरत असलेल्या श्वान पथकाची मदत मागविली.

दिनांक 29/09/2023 रोजी सायंकाळी 16:00 वा श्वान ‘विराट’ला त्याच्या हँडलरद्वारे या मुलीच्या घरातील तिच्या एका वापरत्या ‘टी-शर्ट’चा गंध देण्यात आला

श्वान ‘विराट’ला गंध मिळता क्षणी त्याने पेढांबे येथील घनदाट जंगलात माग काढत काही वेळातच पोलीसांना व तिच्या नातेवाईकांना त्या मुली जवळ नेऊन उभं केलं.

हरवलेल्या मुलीसह पोलीस

या मुलीला श्वान ‘विराट’च्या मदतीने पोलीसांना पेढांबे येथील घनदाट जंगलातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

या मुलीचं योग्य समुपदेशन करून तिची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे व तिला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आलेले आहे.

ही कारवाई, खालील नमूद पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच श्वान यांनी केलेली आहे,
1) सपोनि सुजित गडदे, अलोरे-शिरगाव पोलीस ठाणे
2) श्वान ‘विराट’
3) श्वान हँडलर महेश हरचिरकर
4) श्वान हँडलर संदेश कोतवडेकर,
5) चा. पोहवा. संभाजी घुगरे,
6) ग्रेड पोउनि अनंत पवार,
7) चा. पोहवा दीपक ओतारी आणि
8) शोध मोहिमेत सामील मुलीचे सर्व नातेवाईक

Advt.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*