नवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट अधिक गडद होत चाललं आहे. भारतात झपाट्यानं वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. अशात देशभरात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरसारख्या औषधांचा तुटवडा आहे. ऑक्सिजन पुरवण्यावर सध्या सरकारचा जोर असून देशभरात ऑक्सिजन वाहतुकीवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. ऑक्सिजन वाहतुकीवर कुठलेही निर्बंध घालू नका, असे सांगत ऑक्सिजन वाहतुकीसाठी केंद्रानं नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.