आरोपींचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची “पाहिजे आणि फरारी आरोपी शोध” संकल्पना

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यातील फरारी आरोपींना शोधण्याची मोहीम जिल्हा पाेलीस दलाकडून हाती घेण्यात आली आहे. ‘पाहिजे आणि फरारी आरोपी शोध’ ही संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी पाेलिसांचे एक पथक तयार केले असून, या पथकाद्वारे पाेलिसांना पाहिजे असलेल्या आणि फरार आराेपींचा शाेध घेण्यात येणार आहे़. १९७२ सालापासून ते २०२१ सालापर्यंत जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे सर्व गुन्हेगार विविध प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. या सर्व गुन्हेगारांची जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकातून माहिती घेतली जात आहे़ त्या सर्व आरोपींचा शोध घेण्यात येत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*