दापोली- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र विविध उपाय योजनां आखल्या जात असून दापोलीतील शिक्षक संघटना अखिल महाराष्ट्र शिक्षक संघामार्फत उपजिल्हा रूग्णालय दापोली येथे ४ आॅक्सीमिटर व सॅनिटायजर, कोकण कृषी विद्यापीठ सीसीसी सेंटर येथे २ आॅक्सीमिटर व सॅनिटाइजर तसेच पंचायत समिती शिक्षण विभाग दापोली येथे कर्मचार्यांसाठी ग्लोज,मास्क,व्हिटॅमीन गोळ्या असे १० किट्स देण्यात आले. शिक्षक पतसंस्थेतील कर्मचार्यांसाठीही सदरचे किट वितरीत करणेत आले. यावेळी अखिल शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रविण काटकर,सल्लागार सुनिल कारखेले,उपाध्यक्ष संभाजी सावंत,अशोक मळेकर,भालचंद्र घुले,उजेर शेख आदि उपस्थित होते.