दापोली ग्रामसेवक संघटनेकडून कोव्हिड सेंटरला आरोग्य रक्षक साहित्याचे वाटप

दापोली-दापोली ग्रामसेवक संघटना तालुका शाखा दापोली यांच्यामार्फत व मा. गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांच्या उपस्थितीत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या किसान भवन दापोली येथील कोवीड सेंटरला आवश्यक असणारे वैद्यकिय साहित्य वाटप करण्यात आले. डिजीटल ब्लड प्रेशर चेक अप मशीन १ ,थर्मल गन २ ,पल्स ऑक्सिमिटर ३,एन ९५ मास्क ४००, हॅण्ड ग्लोव्हज २००,हेड कॅप ४००,डिस्पोजेबल ५ लेयर मास्क ४०० आदी आरोग्य सुरक्षा सुविधा साहित्य वाटप सोमवारी करण्यात आले. साहित्य कोवीड सेंटर मधिल वैद्यकिय अधिकारी डॉ. मोहिते, डॉ. प्राची श्रीरामे यांच्या ताब्यात हे साहित्य किसान भवन येथील कोव्हीड सेंटरमध्ये देण्यात आले. यावेळी दापोली ग्रामसेवक संघटना अध्यक्ष सुरेंद्र महाडिक, सचिव संदिप सकपाळ, जिल्हा सहसचिव सुमित तांबे, माजी चेअरमन व सल्लागार शरद गौरत, तालुका संचालक प्रदिप चव्हाण,कार्यकारी सदस्य अनंत कोळी, रुपेश शिंदे,के. डी.साळुंखे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*