महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांचा कारभार सध्या एकतर्फी आणि मनमानीपणे सुरु आहे. कामगारांना विश्वासात न घेताच निर्णय लादले जात आहेत. तसेच खासगीकरणाच्या हालचाली सुरू आहेत.त्याच्या निषेधार्थ वीज कामगार आक्रमक झाले असून 28 आणि 29 मार्च रोजी संप करण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारची मालकी असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सुमारे 80 हजारांहून अधिक वीज कामगार कार्यरत आहेत. राज्याला अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी ते ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता चोवीस तास कार्यरत असतात. कोरोना महामारीमध्येही त्यांनी अखंडित वीजपुरवठा केला आहे.
मात्र सध्या प्रशासनाकडून कर्मचाऱयांना विश्वासात न घेताच निर्णय घेतले जात असल्याने कामगारांमध्ये मोठी नाराजी आहे