दापोली: तालुक्यातील टाळसुरे येथील एका ६०वर्षीय व्यक्तीचा बस मधून प्रवास करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना आज दापोली बस स्थानक येथे आज२२ फेब्रुवारी रोजी १२.५० व.च्या सुमारास घडली असून याबाबत दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
या बाबत दापोली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार अनंत सखाराम साळवी रा.टाळसुरे हे आज २२फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा.सुमारास टाळसुरे येथून दापोली येथे बाजारहाट साठी आले होते खरेदी झाल्या नंतर ते दापोली बस स्थानकात येऊन त्यांनी दापोली-खेड बस पकडली मात्र बस मध्ये बसताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला त्यांना तात्काळ दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासा अंती मृत घोषित केले याबाबत दापोली पोलीस ठाण्यात महेंद्र
साळवी यांनी खबर दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गुजर हे करीत आहेत.