रत्नागिरी – येथील विशेष कारागृहातील स्वा. वि. दा. सावरकर कोठडीचे सुशोभिकरण आणि बंदींसाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नुतनीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन करण्यात आले. ८ कोटी २४ लाख रुपयांच्या निधीमधून ही कामे होणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कारागृहातील स्वा. वि. दा. सावरकर यांच्या कोठडीला भेट दिली.
या ठिकाणच्या स्वा. वि. दा. सावरकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी वंदन केले.

नंतर त्यांच्या छायाचित्र दालन आणि हस्तलिखिताची पाहणी केली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार योगेश कदम यांनी पुष्प वाहून वंदन केले. यावेळी कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अधीक्षक रामराजे चांदणे आदी उपस्थित होते.
