देवेंद्र फडणवीसांनी स्विकारलं 100 अनाथ बालकांचं पालकत्व

मुंबई : नागपूरमधील श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सोबत’ हा उपक्रम राबवण्यात आला. कोरोना महामारीच्या संकटात आई-वडील गमावलेल्या 100 मुलांना आधार देण्याचं काम या ट्रस्टद्वारे करण्यात येत आहे. या संस्थेच्या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलविण्यात आलं होतं. यावेळी, बोलताना देवेंद्र फडणवीसांनी पहिल्याच दिवशी नोंदणी झालेल्या 100 अनाथ मुलांचं पालकत्व स्विकारलं आहे. आपल्या या निर्णयामुळे त्यांनी लाखोंचं मन जिंकलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*