फेडरल बँकेमार्फत लस साठवणुकीसाठीच्या रेफ्रिजरेटरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे-फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत कोविड- १९ लसीकरण कार्यक्रमासाठी विविध आरोग्य सेवा केंद्रांना लस साठवणुकीसाठी १०० रेफ्रिजरेटरचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झाले.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, फेडरल बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोविड प्रतिबंधक लस एका विशिष्ट तापमानात ठेवणे गरजेचे असते, ते तापमान कायम राखण्यासाठी शीत यंत्राची गरज असते. आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना आज लसीकरण सुरु झाले असून या वयोगटात खूप मोठी लोकसंख्या आहे. ही संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने लसीकरण नियोजन केले आहे, त्यासाठी हे रेफ्रिजरेटर वापरले जाणार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*