रत्नागिरी : जिल्हा स्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. मार्चचा लोकशाही दिन सोमवार 7 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दुपारी 1 ते 2 वाजता या वेळेत होणार आहे. लोकशाही दिनाकरीता नागरिकांना संबंधित तहसील कार्यालयामध्ये उपस्थित राहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होता येईल.