दापोलीत पर्यटन वाढीसाठी विमानतळाची मागणी

दापोली : तालुक्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक वाढावेत याकरिता विमानतळाची मागणी लाडघर बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तालुक्यातील हर्णैजवळील २३५ एकर जागा विमान तळासाठी सुचविण्यात आलेली आहे. यामध्ये २१७ एकर जागा सपाट व शासकीय गायरान म्हणून उपलब्ध आहे.

यापैकी पाच टक्के जागा नियमाप्रमाणे लागवडीसाठी सोडून उर्वरित जागेत विमानतळ करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.

ही जागा रेवसरेड्डी राष्ट्रीय महामार्गापासून केवळ १ कि.मी. अंतरावर असल्याने विमानतळावरून येणे-जाणे देखील सोयीचे होणार आहे. या जागेपासून रत्नागिरीचे विमानतळ १५० कि.मी. अंतरावर नवी मुंबईचे विमानतळ २०० कि.मी. अंतरावर आहे.

शिवाय विमानतळासाठी सुचविलेली जागा हर्णै सुवर्णदुर्ग किल्ल्ल्यापासून तीन कि.मी. अंतरावर तसेच श्रीवर्धन, गुहागर, खेड व मंडणगड तालुक्यातील केवळ पन्नास कि.मी.च्या आत असल्याने या सर्व तालुक्यांना या विमानतळाचा मोठा उपयोग होणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*