मुख्यमंत्री पशुस्वास्थ फिरत्या दवाखान्याचे मंडणगड मध्ये लोकार्पण सोहळा संपन्न

मंडणगड: महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजने अंतर्गत फिरता पशुवैद्यकीय दवाखान्याचा लोकार्पण सोहळा दापोली विधानसभा मतदार संघाचे आ. योगेश दादा कदम यांच्या शुभहस्ते नुकताच पशुवैद्यकीय दवाखाना मंडणगड येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती महेश नाटेकर, माजी आरोग्य बांधकाम सभापती आण्णा कदम, माजी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, मंडणगड पंचायत समिती सभापती सौ. स्नेहल सकपाळ, माजी सभापती व विद्यमान सदस्य आदेश केणे, शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, तालुका संघटक अनंत लाखण, महिला आघाडी तालुका संघटक सौ. अमिता शिंदे, शिवसेना उपतालुका प्रमुख हरिश्चंद्र कोदेरे, सुरेश दळवी, माजी उपतालुका प्रमुख श्री. दोस्त महम्मद चोगले, विभाग प्रमुख संजय शेडगे, राजेश भवणे, उपविभाग प्रमुख दिनेश गायकवाड, सरपंच उपसरपंच, शाखा प्रमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*