कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. तरीही देशभरातील शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी आकारली जात आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने या शाळांना फी कमी करण्याचे आदेश दिले आहेत.
आता सर्व पालकांच्या नजरा संस्था चालकांवर लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर ही फी लवकरात लवकर कमी करण्यात यावी, अशी अपेक्षा पालकांनी केली आहे.
गेल्या वर्षीच्या मार्चपासून लॉकडाऊन सदृष्य स्थिती देशात असल्यामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. दोन वेळ जेवणाची भ्रांत असताना संपूर्ण फी कशी भरायची याची चिंता पालकांना होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर पालकांना दिलासा मिळाला आहे.