मुंबई राज्य राखीव पोलीस दलातून राज्य पोलीस दलात बदलीसाठी आवश्यक सेवेची १५ वर्षांची अट शिथील करून १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रतिनियुक्तीच्या अटी-शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
तसेच बदली झाल्यानंतर पहिली पाच वर्षे जिल्हा पोलीस मुख्यालयात कर्तव्य करावे लागत आहे. त्यामध्ये बदल करुन हा कालावधी दोन वर्षे करण्यात आला आहे.